बहुजननामा ऑनलाइन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दिघाच्या दत्तपूर गावात एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. ममता बॅनर्जी यांनी दत्तपूर गावच्या एका स्टॉलमध्ये चहा बनविला . त्याचबरोबर लोकांची सेवादेखील केली.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर चहा बनवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येते की स्थानिक लोकांनी त्यांना घेराव घातला आहे.तसेच या व्हिडिओमध्ये त्या एका चिमुरडीबरोबर खेळताना दिसत आहे. बॅनर्जी यांनी व्हिडिओसह लिहिले की, ‘कधीकधी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंदित करतात. चांगला चहा बनविणे आणि इतरांना त्याचा आस्वाद देणे त्यापैकी एक आहे. या व्हिडिओमध्ये ममता ह्या स्थानिक लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
व्हिडिओच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी एका लहान मुलीबरोबर बऱ्याच वेळ खेळताना दिसतात. नंतर त्या दुकानातून खायचे पाकिट तिला तोडून देतात . यानंतर, त्या स्वतःच दुकानात उभ्या राहून चहा बनवतात आणि एका कपमध्ये सर्व्ह करून लोकांना देतात. यानंतर ममता बॅनर्जी स्वत: लोकांसमवेत समवेत बसून चहाचा घोट घेतात आणि स्थानिक लोकांशी गप्पा देखील मारतात.
Sometimes the little joys in life can make us happy. Making and sharing some nice tea (cha/chai) is one of them. Today, in Duttapur, Digha | কখনো জীবনের ছোট ছোট মুহূর্ত আমাদের বিশেষ আনন্দ দেয়। চা বানিয়ে খাওয়ানো তারমধ্যে একটা। আজ দীঘার দত্তপুরে। #Bangla pic.twitter.com/cC1Bo0GuYy
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 21, 2019