बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Panday) गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर चर्चेत येतान दित आहे. आताही ती सोशल मीडियावर साऱ्यांचं अटेंशन घेताना दिसत आहे. आपल्या हॉटनेसंमुळं अनन्या चर्चेचा विषय ठरली आहे.
अनन्यानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात अनन्या खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिकिनी घातली आहे. यात अनन्या तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. खास बात अशी तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे फोटो मालदीवमधील व्हॅकेशनचे आहेत.
अनन्याचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चताहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. फोटोतील तिचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे असतात.
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. फायटर असं या सिनेमाचं नाव आहे. इतकंच नाही तर ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. अनन्यानं स्टुडेंट ऑफ द ईयर 2, पती पत्नी और वो, खाली पीली अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.