बहुजननामा ऑनलाईन टीम : अमेरिकन अंतराळ संस्था नासा (Nasa) अवकाश अभ्यासाकरता दोन महिन्यांच्या झोपेसाठी १४ लाख रुपये देते. आता अशीच काहीशी गोष्ट भारतात सुरू होणार आहे. कर्नाटकमधील बेंगलुरूची (Bengaluru) ऑनलाइन कंपनी वेकफिट (Wakefit) ने म्हटले आहे की, रोज रात्री १०० दिवस सलग ९ तास झोपणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपये देण्यात येतील. ऑनलाइन स्लीप सोल्यूशन फर्मने आपल्या प्रोग्रामला स्लीप इंटर्नशिप (Sleep internship) असे नाव दिले आहे. जेथे निवडलेल्या उमेदवारांना १०० दिवसांसाठी रोज रात्री न चुकता तब्बल ९ तास झोपावे लागेल.
निवडलेले उमेदवार कंपनीच्या गाद्द्यांवर झोपतील. याव्यतिरिक्त, स्लीप ट्रॅकर्स आणि तज्ञ यांच्यासमवेत समुपदेशन सत्रांमध्येही ते भाग घेतील. तथापि, ज्या लोकांना या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये शॉर्टलिस्ट केले जाईल त्यांना त्या कंपनीला एक व्हिडिओ पाठवावा लागेल ज्यामध्ये त्यांना किती झोपायला आवडेते हे सांगावे लागेल.
स्लीप ट्रॅकर देखील वापरला जाईल
या प्रक्रियेत एक स्लीप ट्रॅकर देखील वापरला जाईल जो इंटर्नशिपसाठी दिलेल्या गाद्यांवर झोपायला जाण्यापूर्वी आणि झोपी गेल्यानंतर रेकॉर्ड नोंदवेल. विजेत्यांना हा स्लीप ट्रॅकर देखील देण्यात येईल.
bestmediainfo.com नुसार कंपनीचे संचालक आणि सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी म्हटले आहे की, स्लीप सोल्यूशन कंपनी म्हणून लोकांना झोपेसाठी प्रेरित करण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे. एकीकडे आपले जीवन वेगवान चालू आहे, दुसरीकडे कमी झोपेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासह, आपल्या जीवनाची गुणवत्ता देखील कमी होत आहे.
ते म्हणाले की, ‘आम्हाला अशा लोकांची भरती करायची आहे जे आपल्या आयुष्यात झोपेला प्राधान्य देत दीर्घकाळ झोपू शकतात. ही इंटर्नशिप करण्यासाठी आपल्याला आपली नोकरी सोडावी लागणार नाही किंवा घराबाहेर पडावे लागणार नाही.’ आपल्यालाही हे इंटर्नशिप करायचे असल्यास, यासाठी आपण कंपनीच्या वेबसाइट https://www.wakefit.co/sleepintern/ वर जा आणि अर्ज करा.
Visit : bahujannama.com