मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इंदुरीकर महाराज मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आता त्यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विधान केले असून त्यांनी इंदुरीकर महाराजांचे काही व्हिडिओ पहिले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचे दिसून आले. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्यांनी महिलांचा आदर कमी होईल अशी विधाने करू नयेत, असे त्या म्हणाल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना अमृता यांनी इंदुरीकर महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले असून त्यांच्याबद्दल आदर असल्याचे म्हटले आहे. अमृता या म्हणाल्या की, त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात, हे सांगतानाच लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या लोकांनी आपल्या मतांचा लोकांवर अधिक प्रभाव पडतो याचे भान ठेवायला हवे.
तसेच त्यांनी इतर विषयांवरही मत मांडले. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याचे पोटेन्शिअल असून आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर असताना महिला सक्षमीकरणासाठी काम केले असून अशा व्यक्तीला महिलांची माफी मागायला लावण्याची आदित्य यांची कृती योग्य नाही आणि ती मनाला पटणारी नसल्याचेही त्यांनी म्हटले.
रश्मी ठाकरे या अनेकांच्या आदर्श असून त्या इन्सापायरिंग वुमन आणि फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र आहेत. रश्मी ठाकरे आणि माझे बॉडिंग चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. मी ‘मातोश्री’वर गेले असताना त्यांनी माझा पाहुणचार केला होता. तसेच त्या वर्षा बंगल्यावर आल्या असताना मीही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, असे त्यांनी सांगितले.