अमरावती न्यूज (Amravati News) : बहुजननामा ऑनलाईन – पत्नी आणि 16 वर्षाच्या मुलीचा खून करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या (husband commits suicide by killing wife and daughter) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी सांयकाळी साडेपच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) दर्यापुर तालुक्यातील (Daryapur taluka) भामोद (Bhamod) या गावात उघडकीस आली. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या (Yevda Police Station) हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Amravati Crime News | husband commits suicide by killing wife daughter in amravati
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
मृतांमध्ये भामोद येथील रहिवासी अनिल दिनकर देशमुख Anil Dinkar Deshmukh (वय-45), पत्नी वंदना देशमुख Wife Vandana Deshmukh (वय-40) व मुलगी साक्षी देशमुख daughter Sakshi Deshmukh (वय-16) यांचा समावेश आहे.
अनिल देशमुख याने आपली पत्नी आणि मुलीचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
मागील काही दिवसांपासून देशमुख यांचे कौटुंबिक वाद (Family disputes) सुरु होते.
शुक्रवारी सायंकाळी परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येऊ लागली.
यावरुन त्यांनी काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज त्यांना आला.
नगारिकांनी तातडीने या घटनेची माहिती येवदा पोलीस ठाण्याच्या (Yevda Police Station) अधिकाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच येवदा पोलीस ठाण्यातील (Yevda Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनिल देशमुख (Anil Dinkar Deshmukh) यांच्या घराची पाहणी केली असता पलंगाखाली 16 वर्षीय साक्षीचा मृतदेह आढळून आला.
घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ जाऊन पाहिले असता कपाटात देशमुख यांच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. याचवेळी घरातील मागच्या खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिसून आले. पुढील तपास पोलीस करित आहेत.
Web Title : Amravati Crime News | husband commits suicide by killing wife daughter in amravati
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले