मुंबई बहुजननामा ऑनलाइन : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये पाच शतकांची कामगिरी बजावली होती. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. क्रिकेट जगात ‘हिटमॅन’ या नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा यांच्या नावाचा खरा अर्थ अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेत सांगितला.
‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनची नुकतीच सुरुवात झाली असून आतपर्यंत चार स्पर्धकांनी यात सहभाग दर्शविला आहे.अमिताभ सध्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रवी जैन या दिल्ली येथील रहिवासी असणाऱ्या स्पर्धकाला एक प्रश्न विचारला, ज्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या नावाचा संबंध होता.
अमिताभनं कोणत्या नावाचा अर्थ लाल रंग किंवा लाल रंगवाला असतो ? असा प्रश्न विचारला यासाठी अमिताभ यांनी रोहित, हार्दिक, विजय, शिखर असे चार पर्याय दिले होते. दरम्यान रवी जैन यांना याचे उत्तर माहित नसल्यामुळं त्यांनी लाईफलाईन वापरली. यावेळी 77 टक्के जनतेनं रोहितच्या नावाला मत दिले. या उत्तरासह रवी जैन यांनी तीन हजार रूपयांचे बक्षिस जिंकले.