मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संघ आणि भाजपाच्या महत्त्वाच्या अजेंड्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोर्चा सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी तिहेरी तलाक, आणि कलम ३७० रद्द केल्याचे विधायक मंजूर केले. आता ज्यापद्धतीने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी उत्तर दिले. त्यावरून भाजपा आणि संघाचा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून अमित शहा हेच समोर येत आहेत.
लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक अमित शहा यांनी मांडले. यावेळी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र. यादरम्यान अमित शहा यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचे श्रेय अमित शहा यांना देण्यात आले. त्यानंतर भाजपा समर्थक त्यांना लोहपुरुष म्हणून उपमा देत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी अमित शहा हेच आहेत.
२०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर अमित शहा यांनी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा केंद्रात भाजपा सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांची जबाबदारी आणखीनच वाढली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी अमित शहा हेच आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच पंतप्रधान होणार, अशी चर्चा सुद्धा भाजपामध्ये चर्चा सुरु झाली आहे. या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भाजपा आणि संघाचा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जात होते.
Visit : bahujannama.com