पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देहुरोड येथील लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे खंदे व निष्ठावाण समर्थक स्वर्गीय माणिक छाजेड यांचे चिरंजीव अमित छाजेड यांची मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजगुरुनगर खेड येथील रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पँथर पंढरीनाथ जाधव व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे कर्तव्यदक्ष युवक जिल्हा अध्यक्ष उमेश कांबळे यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अमित छाजेड यांनी देहू रोड शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांच्या निवडीने नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. इतकेच नाही तर त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तरुणांमध्येही आनंदाचे वातवरण आहे. अमित छाजेड यांच्या पत्नी शीना छाजेड या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा म्हणून प्रभावीपणे काम करत आहेत. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अमित छाजेड म्हणाले की, “रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात सक्षमपणे काम करून तरुणांची मोठी फळी उभारणार.”
यावेळी प्रदेश सचिव हरेश देखणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुदादा भोसले, जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस, पारधी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, शिरुर तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सरचिटणीस कैलास कांबळे, उपाध्यक्ष गौतम गायकवाड, कार्याध्यक्ष पोपटराव सरोदे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष नामदेवराव नेटके, रिक्कु पवार, जिल्हा युवक आघाडीचे विक्रम आढाव, प्रदीप बनसोडे यांच्यासह पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.