बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट बुद्धीचे, धैर्याचे, शौर्याचे आणि युद्धनितीचे दर्शन घडविणाऱा फत्तेशिकस्त चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.महाराजांच्या नेतृत्वाखाली कुशल युद्धनितीच्या जोरावर मराठ्यांनी केलेले पहिले सर्जिकल स्ट्राईक फत्तेशिकस्त च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
फर्जंद या चित्रपटानंतर निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला, महाराजांच्या कुशल युद्ध नीतीचे दर्शन घडविणारा भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार प्रेक्षकांना ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्यातून आल्मंड्स क्रिएशन्स द्वारा तयार करण्यात आला आहे. या चित्रपटातून शिवरायांच्या गनिमी काव्याचे थरारक अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. जगभरातील अनेक सैन्य दलांत त्यांच्या युद्धनीतीचे धडे दिले जातात. आता निर्माता लांजेकरांनीही महाराजांच्या महान नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा फत्तेशिकस्त मधून मांडली आहे.
या चित्रपटाने पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. आता ‘थेट घुसायचं आणि गनिमाला तोडायचं’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. शिवरायांची तळपती तलवार आणि त्यांचा दरारा यात पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. असाच थरार या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. या थरारक चित्रपटाचे छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे असणार आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असणार आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे असेल. व्हि. एफ. एक्स इल्युजन ईथिरिअल स्टुडियोज यांचे आहे. रंगभूषा सानिका गाडगीळ यांचे असणार आहे.
https://www.instagram.com/p/B1vjm8oHeeU/