वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – मागील महिन्यातच एका लघुग्रहाने पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याचा विक्रम केला होता. आता आणखी एक लघुग्रह पृथ्वीच्या खुप जवळून जाणार आहे. यावेळेस हा लघुग्रह चंद्र आणि पृथ्वीच्या मधील अंतराच्या सुद्धा कमी अंतरावरून एक सप्टेंबरला जाईल. अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने ही माहिती दिली आहे. या लघुग्रहाचे नाव 2011 ईएस3 आहे. पुढील एक दशकापर्यंत पृथ्वीच्या जवळून जाणार्या लघुग्रहांपैकी हा सर्वात जवळून जाणार आहे.
आकार 22 ते 49 मीटरच्या दरम्यान
नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीनुसार, यापूर्वी हा लघुग्रह 2011 मध्ये 13 मार्चला पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला होता. यावेळी चिंता या गोष्टीची आहे की, हा लघुग्रह पृथ्वीपासून केवळ 45,000 मैलावरून जाणार आहे. या उल्काष्माचा आकार 22 ते 49 मीटरच्या दरम्यान आहे. नासाने दावा केला आहे की, एक सप्टेंबरला हा लघुग्रह (अस्टेरॉईड) पृथ्वी आणि चंद्राच्या मधून जाईल.
पृथ्वीवर धडकणार नाही
जगभरातील लोक उत्सुकतेने प्रश्न विचारत आहेत की, अस्टेरॉईड-2001 ईएस4 नावाचा हा उल्काष्म पृथ्वीवर आदळू शकतो का. यावर नासा अस्टेरॉईड वॉचने ट्विट केले आहे की, अस्टेरॉईड-2001 ईएस4 पृथ्वीवर आदळणार नाही. मात्र, हे निश्चित की पृथ्वीच्या अतिशय जवळून तो जणार आहे. तो पृथ्वीवर आदळण्याचा कोणताही धोका नाही.
8.16 किलोमीटर प्रति सेकंद आहे स्पीड
नासा अस्टेरॉईड वॉचने म्हटले आहे की, या लघुग्रहाचा स्पीड सुमारे 8.16 किलोमीटर प्रति सेकंद आहे. हा उल्काष्म यापूर्वी सुद्धा पृथ्वीच्या जवळून गेला आहे. मागच्यावेळी तो पृथ्वीवरून लागोपाठ चार दिवस दिसत होता. पृथ्वीपासून याचे अंतर 1.2 लाख किलोमीटर असेल तर चंद्रापासून तो 3.84 लाख किलोमीटर दूर असेल. हा लघुग्रह पहिल्यांदा 2011 मध्ये दिसला होता आणि प्रत्येक नऊ वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळून जातो आहे.
2011 मध्ये शोधण्यात आला
शास्त्रज्ञांनुसार, हा खुप धोकादायक श्रेणीतील लघुग्रह आहे. याचा शोध सर्वप्रथम 2011 मध्ये लावला गेला होता. प्रत्येक नऊ वर्षानंतर हा पृथ्वीच्या जवळून जातो.