नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला असून ज्या लोकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे ते लोकं परत आजारी पडत आहेत. चीनच्या दक्षिण पश्चिम सिचूआनमधील चेंगदू येथे असे एक प्रकरण आढळून आले असून दाखल केलेल्या व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला होता. शहरातील सार्वजनिक आरोग्य निदान केंद्राने ही माहिती दिली आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार रुग्णाला डिस्चार्ज दिल्याच्या १० दिवसानंतर केलेल्या चाचणीत त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चीनमध्ये ही एकच घटना नसून दुसऱ्या भागातूनही अशा घटना घडल्याचे एका अधिकारीक विधानात म्हटले गेले आहे. डिस्चार्ज केल्या गेलेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना व्हायरसची पुष्टीच्या नमुन्यांमध्ये विसंगतीमुळे कारण झाली असेल.
एका अधिकारीक गाइड लाइनमध्ये डिस्चार्ज केल्या गेलेल्या रुग्णाला परत केलेली चाचणी निगेटिव्ह आली पाहिजे. अशात डॉक्टरही हैराण झाले आहेत. सिचुआन प्रांतात व्हायरसमुळे न्यूमोनियाचा उपचार करत असलेल्या एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलने रुग्णांना सुट्टी द्यायच्या अगोदर चाचणीत नाक आणि गळा सुजण्याच्या परीक्षणाचा उपयोग केला. त्यात फुफ्फुसातून निघणाऱ्या नमुन्यांची तपासणीही आवश्यक आहे.
हुबेई प्रांतातून आणखी एक घटना समोर आली असून एका ७० वर्षीय व्यक्तीला २७ दिवस कोरोना विषाणूची लक्षणे दिसली नाहीत. नंतर मात्र त्याला कोरोनाची लागण झाली. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांचे पुढील १४ दिवस देखरेख करणे आवश्यक आहे, असे सुचवले आहे. दरम्यान रुग्णांनी बाहेरील लोकांना भेटू नये आणि नेहमीच मास्क वापरावे.