खंडवा : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील खंडवा शहरात छोट्याशा कारणावरून मुलानेच हत्या आपल्या आईची केली आहे. तब्ब्ल पाच दिवस आईचा मृतदेह त्याने घरातील पेटीमध्ये ठेवला होता. मृतदेहाची दुर्गंधी यायला लागला म्हणून त्याने तो गोणीत भरला आणि कोतवाली ठाणे परिसरात रामनगरातील साई मंदिराजवळ नाल्यात फेकून दिला. खंडवाचे पोलीस अधिक्षक शिवदयाल सिंह यांनी शनिवारी सांगितले, विमला बाई (50) हिच्या हत्या प्रकरणात तिचा मुलगा संतोष पाटील (32) याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.
आरोपी झाला सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. याबाबत संतोष हा व्यक्ती पाठीवर गोणी घेऊन जात असल्याचा दिसत आहे. त्यानंतर पोलिसानी संतोषला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता आपण आईची हत्या केल्याचे संतोषने कबूल केले.
क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
टिव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका पाहुन त्याने आईच्या हत्येचा कट रचल्याचे आरोपीने सांगितले. त्याची परिस्थिती हलाखीची होती. त्याला त्याची आई पैसे कमविण्यासाठी सांगत असे. त्याला सल्ले देत होती. त्यामुळे आरोपीने रागाच्याभरात आईची हत्या केली. अशी माहिती खंडवाचे पोलीस अधिक्षक शिवदयाल सिंह यांनी दिली.