बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतात जारी करण्यात आलेले सर्व प्रकारचे डेबिट व क्रेडीट कार्ड आता बँकेचे ग्राहक आपल्या मनाप्रमाणे कधीही ऑन-ऑफ करू शकतील. कार्डमध्ये होणार्या फ्रॉडमध्ये वाढ झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने याप्रकारची सुविधा सुरू करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत.
बँकांचे ग्राहक आपल्या डेबिट व क्रेडीट कार्डवर ऑनलाइन, फिजीकल, कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन आपल्याला वाटेल तेव्हा ऑन-ऑफ करू शकतात. याच बरोबर कार्डवर ट्रांजेक्शन लिमिटीसुद्धा सेट करू शकतील. हा नियम पाईंट ऑफ सेल मशीन आणि एटीएमवरही लागू आहे. नवीन जारी करण्यात येणारे कार्डसुद्धा केवळ एटीएम आणि पाईंट ऑफ सेल मशीनवर वापरता येतील. अन्य ट्रांजेक्शन जसे की ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस करण्यासाठी ग्राहकांना हे स्व:ता अक्टिव्हेट करावे लागेल.
हा नवा नियम संपूर्ण देशात 16 मार्च 2020 पर्यंत लागू होईल. केंद्रीय बँकेन म्हटले की, बँकांना आपल्या ग्राहकांना ही सुविधा मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम अथवा आयव्हीआरवरून द्यावी लागेल. याशिवाय बँक ग्राहक बँकेच्या शाखेत जाऊनही ही सुविधा प्राप्त करू शकतात. परंतु, ज्या जारी केलेल्या कार्डचा वापर कधीही ऑनलाइन, पीओएस अथवा काँटॅक्टलेस ट्रांजेक्शनसाठी केलेला नाही, त्यांना ही सुविधा मिळणार नाही.
*हा नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड आणि बस, मेट्रोमध्ये वापरण्यात येणार्या कार्डवर लागू नाही.*
Visite : bahujannama.com