नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पसरलेल्या घातक कोरोना वायरसचा अटॅक आता कम्प्युटर आणि मोबाईलवर सुद्धा होऊ शकतो. त्यांना सुद्धा या वायरसचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. तुमच्याकडे आलेला मेल किंवा फाईल कोरोना वायरसने संक्रमित असू शकते. चीनमध्ये कोरोना वायरस ज्याप्रकारे पसरत आहे, त्यांनतर त्याबाबत अनेक गोष्टी इंटरनेटवर पसरत आहेत. यामध्ये त्या फाईली आणि मेलसुद्धा आहेत, ज्या कोरोना वायरसच्या संकटाकडे घेऊन जाऊ शकतात. हा वायरस मोबाईल आणि कम्प्युटरवर हल्ला करून त्याला सुद्धा संक्रमित करू शकतो.
सायबर गुन्हेगारांनी तयार केला कोरोना वायरस
सायबर सेक्युरिटी फर्म कास्पेरेस्कीने हा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार कोरोना वायरसबाबत अनेकप्रकारची माहिती आणि फाईल्स पाठवल्या जात आहेत. कास्पेरेस्कीचे म्हणणे आहे की, त्यांनाही अशा काही फाईल्स मिळाल्या ज्यात वायरस होता.
इंटरनेटवरील कोरोना वायरस काय आहे.
मोबाईल आणि कम्प्युटरवर कोरोना वायरस नावाचा जो वायरस हल्ला करू शकतो, तो प्रत्यक्षात चीनमध्ये पसरत असलेला कोरोना वायरस नाही, तर कम्प्युटर आणि मोबाईलवर हल्ला करणारा ट्रोजन आणि मालवेयर आहे, जो भितीच्या या वातावरणात काही सायबर गुन्हेगारांनी तयार करून लोकांना कोरोना वायरस नावाच्या फाईल्सने पाठवण्यास सुरूवात केली आहे.
या फाईल्समध्ये आहे ट्रोजन आणि मालवेयर
कास्पेरेस्कीचे म्हणणे आहे की, जगभरात पसरत असलेल्या कोरोना वायरस आजाराच्या दरम्यान, कोरोना वायरसच्या नावाने अनेक माहिती आणि फाईल्स इंटरनेटवर दिसत आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की कोरोना वायरसबाबत त्यांच्याकडे महत्वाची माहिती आहे. हा प्रत्यक्षात ट्रोजन आणि मालवेयर आहे, जो या फाईल्स उघडताच तुमच्या कम्प्युटर आणि मोबाईलचे नुकसान करू शकतो.
कम्प्युटरवर कसे रहाल सावध
कास्पेरेस्कीचे मालवेयर अॅनालिस्ट अंतोन इवानोव्ह यांचे म्हणणे आहे की, सध्या संपूर्ण जगात कोरोना वायरसवर सर्वात जास्त चर्चा होत आहे. या संधीचा फायदा सायबर गुन्हेगार उठवू पहात आहेत. आम्ही आतापर्यंत अशा अनेक फाईल्स पाहिल्या ज्या कोरोना वायरसच्या नावाने आल्या आणि त्यांनी ट्रोजन, रॅन्समवेयरने भरलेल्या आहेत. यासाठी सावध रहा. इवानोव्ह यांच्या माहितीनुसार जर तुम्ही विचार न करता या फाईल्स ओपन केल्या तर त्यामधील ट्रोजन, मालवेयर, रॅन्समवेयर आणि अन्य नुकसानकारक वायरस आपकी डिव्हाईसला ब्लॉक करू शकतात किंवा डिव्हाईसवरील डाटा कॉपी अथवा मॉडिफाय करू शकतात, तुमची महत्वाची माहिती चोरू शकतात.
धोकादायक ठरू शकतात या फाईल्स आणि मेल
लक्षात ठेवा कोरोना वायरसच्या नावाने येत असलेल्या फाईल्स आणि मेल धोकादायकसुद्धा ठरू शकतात. यात कोणत्या प्रकारचे ट्रोजन असू शकतात याची यादी प्रसिद्ध अँटी वायरस फर्म कास्पेरेस्कीने जारी केली आहे.
कशी कराल तपासणी
ही सर्व नावे ओळखणे युजर्ससाठी अवघड आहे. यासाठी अशी कोणतीही फाईल उघडण्यापूर्वी फाईलच्या डिटेल सेक्शनमध्ये जाऊन तिच्याबाबत माहिती घेऊन ती वर्ड डॉक्युमेन्ट आहे, पीडीएफ आहे, व्हिडिओ आहे, किंवा डॉट ईएक्सई अथवा डॉट एलएनके एक्सटेन्शन फॉर्म तर नाही ना, याबाबत माहिती घ्या. अशा फाईल्सची माहिती घेणे आपल्यासाठी खुप जरूरी आहे.