मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांची मनधरणी करण्याचा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केला, एवढेच काय सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांना आवाहन केले होते की काहीही झालं तरी परत ये. यानंतर आज सकाळी ट्रायडंट हॉटेलवर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांचे मन वळण्याचा प्रयत्न केले. त्याआधी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.
त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार होते. परंतू त्या आधीच अजित पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.अजित पवार यांची आज सकाळी मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी त्यांनी एका शासकीय कार्यक्रमाला जाणे देखील टाळले. त्यामुळे अजित पवार घरवापसीचा मार्ग खुला ठेवत आहेत का अशी प्रश्न उपस्थित केला जात होता.
अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, परंतू पदभार स्विकारला नव्हता. त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याचे वृत्तसमोर आले आहे.
Visit : bahujannama.com