बहुजननामा ऑनलाईन टीम : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये काँग्रेस आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे उद्या बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गटनेत्यांच्या निवडीसोबतच पुढील २४ तासांतील आपल्या भूमिकेसंदर्भात मल्लिकार्जून खर्गे यांनी या बैठकीत उपस्थित आमदारांना सूचना दिल्या.
काँग्रेससोबतच शिवसेनेच्या विधिमंडळनेतेपदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारत भाजपला पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, त्याविरोधात महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांनी सुप्रित कोर्टात याचिका दाखल केली. यासंदर्भांत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून उद्या, २७ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कोर्टाने फडणवीस सरकारला दिले आहेत.
यासंदर्भात न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाने निकाल दिला आहे. महत्वाचे म्हणजे फ्लोअर टेस्ट मतदान गुप्त पद्धतीने न घेता ते लाइव्ह टेलिकास्ट करण्याचे निर्देशही सरकारला देण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुमत सिद्ध करण्यासाठी आता फडणवीस सरकारकडे ३० तासांचा अवधी उरला आहे.
Visit : bahujannama.com