मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावरही कोणते खाते कोणत्या मंत्र्याला द्यायचे हे ठरत नाहीये. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले असून वित्त खातेही मिळण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्रीवर बैठक झाली, असे ऐकल्याचे अजित पवार यांनी त्यांना कोणते खाते मिळणार असल्याचे विचारले असता सांगितले.एखादे संबंधित खातेच मिळावे यासाठी बैठक झाली असल्याची माहिती मिळत आहे.
खात्याच्या प्रमुखाकडे कोणते खाते कोणाला द्यावे याचे अधिकार असतात. तसेच कुणी काय मागावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी व इतर मित्रपक्षांचे सरकार असून कोणाला कोणते खाते द्यावे, याबाबत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील.
नवीन वर्षात खाटेवाटप होऊन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी आपले काम सुरु करावे, अशी जनतेची इच्छा आहे. ३६ जणांना मंत्रिपद मिळाले नसून त्यांना मंत्रिपद दिल्यास ते आपआपली जबाबदारी पार पाडतील. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला कोणते खाते द्यावे याची यादी मुख्यमंत्र्यांना दिली असून ती जाहीर करणं मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे, असे अजित पवार म्हणाले.
Visit : bahujannama.com