मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे सरकार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आज नवीन प्रवेश झालेल्या मंत्र्यांना शासनाकडून राहण्यासाठी बंगले दिले जाणार आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पसंतीचा म्हणजे मलबार हिल मधील ‘देवगिरी’ बंगला देण्यात आला असून आदित्य ठाकरे यांना मंत्र्यालायासमोरचा ‘अ-६’ हा बंगला देण्यात आला आहे. याअगोदर हा बंगला तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला गेला होता.
परिपत्रक काढून आज ३६ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना बंगल्याचे वाटप केले आहे. तसेच अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा, राजेश टोपे यांना जेतवन, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी असे बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.
मंत्र्यांना पुढीलप्रमाणे बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.
अमित देशमुख – अ ४
बाळासाहेब पाटील – क ६
संजय बनसोडे – रॉकीहील टॉवर १२०३
दत्तात्रय भरणे – अवंती १
आदित्य ठाकरे – अ ६
नवाब मलिक – अ ५
शंकरराव गडाख – सुरुची १६
हसन मुश्रीफ – ब ५
अस्लम शेख – क २
बच्चू कडू – रॉकीहील टॉवर १२०२
संदीपान भुमरे – क ४
शंभुराज देसाई – यशोधन १२
प्राजक्त तनपुरे – निलांबरी ४०२
राज्यमंत्री अब्दुल सत्तार – सुरुची १५
आदिती तटकरे – सुनिती १०
सुनील केदार – ब ७
विश्वजीत कदम – निलांबरी ३०२
गुलाबराव पाटील – क ८
उदय सामंत – ब २
दादाजी भुसे – ब ३
यशोमती ठाकूर – ब ६
राजेंद्र यड्रावकर पाटील – सुरुची २
जितेंद्र आव्हाड – ब १
सतेज पाटील – सुरुची ३
अनिल परब – क ५
धनंजय मुंडे – अ ९
विजय वडेट्टीवार – अ ३
के. सी पाडवी – क ३
वर्षा गायकवाड – ब ४
संजय राठोड – क १
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा अ-९ हा बंगला बदलून अवंती-८ हा बंगला देण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com