ऐरोली : बहुजननामा ऑनलाइन – ऐरोली विधानसभा मतदार संघात गणेश नाईक हे ७८ हजार २२८ मतांनी विजयी झाले आहेत. गणेश नाईक हे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार असून त्यांना एकूण १ लाख १४ हजार ३८ मते मिळाली आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश शिंदे यांचा पराभव झाला आहे. शिंदे यांना ३५ हजार ८१० मते मिळाली आहेत.
युतीमध्ये ऐरोली मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिवसेनेत नाराजी व्यक्त केली जात होती. त्यात ऐरोली विधानसभा मतदार संघात गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. गणेश यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र गणेश नाईक यांच्या विजयाची खात्री असल्याने नाईक यांच्या समर्थकांत सकाळपासूनच उत्साही वातावरण होते.
दरम्यान ऐरोली मतदार संघात मनसेचे निलेश बाणखेले यांना २२ हजार ६९२ मते, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश ढाकणे यांना १३ हजार २९९ मते मिळावी असून ५ हजार १८७ जणांनी नोटा हा पर्याय निवडला आहे.
Visit : bahujannama.com