मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचा नेहमीच उल्लेख केला जातो. या घराणेशाहीमुळे पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळत नव्हती. राज्यात मोजक्याच परिवारांचे वर्चस्व असल्याने त्यांची पुढची पिढी त्यांची गादी चालवताना दिसते. या विधानसभा निवडणुकीतही असेच काहींसे चित्र दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार, देशमुख, मुंडे, चव्हाण, विखे पाटील ते आता ठाकरे घराणे देखील निवडणुकीत सहभाग घेत आहे. ठाकरे घराण्यातील पहिली पिढी ही प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरली होती. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान आदित्य यांनी ६७ हजारांनी विजय मिळविला आहे.
राज्यातील पॉवरफुल घराणे म्हणजे पवार घराणे अजित पवार यांच्यासोबतच रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविली. राम शिंदे यांचा पराभव करत रोहित यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली आहे. अजित पवार यांनीदेखील आपला गड कायम राखला आहे. तसेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भाचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे देखील विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेढलेल्या परळी विधानसभा मतदार संघातील मुंडे बहीण -भाऊ यांच्यातील लढत सर्वात रंगतदार होती. या लढतीत धनंजय मुंढे हे विजयी झाले आहेत.
लातूरमध्ये देखील दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मधून बहुमत मिळवत बाजी मारली आहे.तर अमित देशमुख लातूर शहरातून विजयी झाले आहेत. ताईच बीडमधील क्षीरसागर काका पुतणे यांच्यातील लढतीची देखील जोरदार चर्चा सुरु होती. येथे संदीप क्षीरसागसर यांनी बाजी मारली असून जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवत विजय मिळविला आहे. तर त्यांचे पुत्र छगन भुजबळ यांना नांदगाव येथून पराभव पत्करावा लागला आहे.
तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी विधानसभेची हॅटट्रिक मारली आहे. तर माढ्यातही बबनराव शिंदे आणि करमाळ्यात संजय शिंदे या शिंदे बंधूनी निवडून लढविली आहे. कणकवली मतदार संघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनाही या निवडणुकीत विजय मिळविला आहे. तसेच जालन्यातून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे विजयी झाले आहेत.
Visit : bahujannama.com