दानवी ऊर्फ परी दर्शन मंचरे (वय साडेपाच वर्षे, रा. गणेशनगर, अकोले बायपास रोड, संगमनेर) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना संगमनेर (sangamner) तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) माहुली येथील हॉटेल निलायम समोर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. (Ahmednagar Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरविण्यासाठी पुढील बाजुला शोषखड्डा घेतला आहे. या खड्ड्यालगत त्यांनी सुशोभिकरणासाठी कारंजे बसविले आहे. दर्शन मंचरे व त्यांची मुलगी परी मंचरे हे रवींद्र लेंडे (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्याकडे कामानिमित्त आले होते. ते घरी परत जात असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते. परी कारंजाकडे खेळत होती. त्याचवेळी हॉटेल बाहेर एका बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ सुरु झाला होता. मंचरे व लेंडे यांचे लक्ष आग लागलेल्या बसकडे असतानाच कारंजालगत असलेल्या शोष खड्ड्यात परी पडली. परीचा आवाज ऐकून तिच्या वडिलांनी तिकडे धाव घेतली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरीक जमा झाले. त्यांनी खड्ड्यातून परीला बाहेर काढले. जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Web Title :- Ahmednagar Crime | Unlucky Five and a half year old Chimukli dies after falling into ‘suction’ pit; Incident on Nashik-Pune highway
Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले