अहमदनगर ( Ahmednagar ) : बहुजननामा ऑनलाईन – एका पोलीस कर्मचाऱ्याने रात्री कामावर असलेल्या सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महिलेवर मैत्री करण्यासाठी दबाव आणत तिला मिठी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना अहमदनगर Ahmednagar अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात घडली असून संबंधित महिला कर्मचाऱ्याने जिल्हा पोलीस कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेने नगर पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याच्यावर राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव हे रात्री कामावर असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यावर माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून त्या महिला कर्मचारी यांचा हात ओढून जवळ घेऊन मिठी मारली होती. या घटनेनंतर घाबरलेल्या पोलीस महिलेने तत्काळ वरिष्ठांकडे तक्रार केली.
त्यानंतर आघाव याने लेखी माफी मागत पुढे असे काही करणार नसल्याचे सांगितले. तर पोलीस महिलेने बदलीची मागणी केली. दरम्यान या नंतर प्रकरण शांत झाले असे वाटले होते पण आघाव याने पुन्हा त्या महिलेची छेडछाड केली. त्यामुळे या महिलेने थेट नगर मुख्यालय गाठत वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानुसार भाऊसाहेब आघाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृपया हे देखील वाचा:
आज कोणते चलन तुम्हाला बनवणार ‘मालामाल’, ‘इथं’ तपासा संपुर्ण यादी
Income Tax विभाग आज लाँच करणार नवीन वेबसाइट, टॅक्सपेयर्सला मिळतील ‘या’ सुविधा; जाणून घ्या
दुसर्यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव