नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रिन्स हॅरी ( prince harry ) आणि मेगन मर्केल यांच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. मुलीचे नाव पिन्स हॅरीच्या दिवंगत आईला श्रद्धांजली म्हणून लिलिबेट डायना ठेवण्यात आले आहे. ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सच्या घरात या दुसर्या बाळाचे आगमन झाले आहे. शुक्रवारी मेगनने एका निरोगी बाळाला जन्म दिला.
न्यूज एजन्सीनुसार, प्रिन्स हॅरी ( prince harry ) आणि मेगनच्या एका प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, या दाम्पत्याच्या घरी लिलिबेट ’लिली’ डायना माऊंटबेटन- विंसडरचे स्वागत करण्यात आले. प्रिन्स हॅरी आणि मेगनने आपल्या मुलीचे नाव क्विन एलिजाबेथ आणि दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या नावावर ठेवले आहे. मेगनने लिलीला कॅलिफोर्नियाच्या सँटा बारबरा कॉटेज हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. हॅरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपस्थित होता.
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या जीवनात सुरू असलेल्या चढ-उतारादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला आहे. अलिकडेच या दाम्पत्याने शाही कुटुंबापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
प्रिन्स हॅरी आणि मेगन आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी अलिकडेच अमेरिकेला गेले होते.
हॅरी आणि मेगनकडून जारी वक्तव्यात म्हटले होते की, चार जूनला आमच्या घरी लीलीचे आगमन झाले आहे. आम्ही विचार केला होता त्यापेक्षा ती कितीतरी जास्त आहे.
आम्ही आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत.
प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या प्रेस सचिवाने सांगितले की, मेगन आणि मुलगी लिली एकदम ठीक आहेत.
मेगन हॉस्पिटलमधून घरी आहे.
–
मेगनने खुलासा केला होता की शाही कुटुंब तिचा मुलगा आर्चीला पिन्स बनवण्यास इच्छूक नव्हते,
कारण त्याच्या जन्माच्या अगोदर त्यांना भीती होती की,
तो कृष्णवर्णीय नसावा.
हॉलीवुड स्टार ओप्रा विन्फ्रे सोबत चर्चेत आर्चीच्या जन्माच्या अगोदर शाही कुटुंबाने पिन्स हॅरीशी याबाबत चर्चा केली होती,
जी त्याच्यासाठी वेदनादायी होती.
या इंटरव्ह्यूनंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल मीडियासोबत जास्त संवाद साधत नाहीत.