अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा अॅड. प्रकाश आंबेडकर व ‘एमआयएम’चे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१ मार्च) दुपारी २ वाजता अहमदनगर येथील स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या सभेला ओवेसी तेथील कि नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीबरोबर आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे. मात्र, जागा वाटपाबाबत अजून तोडगा निघालेला नाही. या परंतु आंबेडकर आणि ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत राज्यभरात जोरदार सभा घेतल्या आहेत . यापूर्वी पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर अकोले, अमरावती या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या . मुंबईतील शिवाजीपार्कवरच्या सभेने गर्दीचे विक्रम मोडीत काढले त्यामुळे राजकीय पक्षाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत .आता नगरच्या सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे वंचित विकास आघाडीने ठरविले आहे .या सभेस ‘एमआयएम’चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिभाऊ भदे तसेच भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनोने, प्रदेश सचिव अमित भुईगळ, वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, नगर जिल्ह्याचे निमंत्रक अॅड. अरुण जाधव, डॉ. जालिंदर घिगे, भारिपचे नगर-दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, अशोक आल्हाट, अशोक बर्डे, अण्णाराव पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.