नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या मुलीच्या बलात्कार्यांची फाशीची शिक्षा माफ करावी. इंदिरा जयसिंह यांनी यासाठी कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे उदारहण दिले आहे, आणि म्हटले आहे की, सोनिया यांनी ज्यापद्धतीने राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीची फाशीची शिक्षा माफ केली, तसेच उदाहरण अशा देवी यांना दाखवून द्यावे.
इंदिरा जयसिंह यांनी म्हटले की, मी आशा देवींचे दु:ख आणि वेदना समजू शकते, परंतु फाशीच्या विरोधात आहे. आशा देवी यांनी इंदिरा जयसिंह यांच्या आवाहनावर संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, इंदिरा जय सिंह त्यांना सल्ला देणारी कोण आहे. अशाच लोकांमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही.
While I fully identify with the pain of Asha Devi I urge her to follow the example of Sonia Gandhi who forgave Nalini and said she didn’t not want the death penalty for her . We are with you but against death penalty. https://t.co/VkWNIbiaJp
— Indira Jaising (@IJaising) January 17, 2020
1 फेब्रुवारीला होणार फाशी
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया गँगरेप केसच्या चारही दोषींसाठी डेथ वॉरंट जारी केले आहे. त्या चौघांना आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येईल. यापूर्वी चारही दोषी विनय, मुकेश, पवन आणि अक्षय यांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. परंतु, एक दोषी मुकेशने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळली. त्यानंतर पटियाला कोर्टाने फाशी देण्याची नवीन तारिख जाहीर केली आहे.
बलात्कार्यांना माफी द्यावी
इंदिरा जय सिंह यांनी म्हटले आहे की, आशा देवींचे दु:ख आणि वेदना समजू शकते आणि पूर्ण सहानभुतीही आहे, परंतु त्यांना विनंती करते की त्यांनी सोनिया गांधींप्रमाणे उदारहण दाखवावे, ज्याप्रमाणे त्यांनी नलिनीला माफ केले होते. मी तुमच्या सोबत आहे, पण फाशीच्या विरोधात आहे.
सल्ला देणारी इंदिरा जयसिंह कोण?
निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याशी लढा देणारी तिची आई आशा देवीने संतापाने म्हटले आहे की, इंदिरा जयसिंहला अशा पद्धतीचा सल्ला देण्याची हिम्मत कशी झाली. मी सुप्रीम कोर्टात त्यांना अनेकवेळा भेटले, परंतु त्यांनी कधीही माझी साधी चौकशीही केली नाही. आज त्या दोषींच्या हक्काबाबत बोलत आहेत. आशा देवी यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, असे लोक बलात्कार्यांना सपोर्ट करून आपले पोट भरतात, म्हणून पीडितांना न्याय मिळत नाही.
गांधी कुटुंबाने माफ केली होती शिक्षा
राजीव गांधी हत्याकांडामध्ये नलिनीला दोषी ठरविण्यात आले आहे. कोर्टाने तिला फाशीची शिक्षण सुनावली होती. परंतु, नंतर तिची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. 1991 मध्ये तिला या प्रकरणी जेलमध्ये पाठविण्यात आले होते. नलिनी सुमारे 26 वर्षांपासून जेलमध्ये बंद आहे. 2008 मध्ये प्रियंका गांधी वाड्रा यांनी तिची भेट सुद्धा घेतली होती. गांधी कुटुंबाने तिला माफ केले आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा