मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करत त्या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटत असल्याचे म्हटले होते. पण एका प्रसार माध्यमाने याबद्दल तपास केला तेव्हा त्यांना करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यात एकाच बैठक झाल्याचे आढळले. ती भेट दिल्लीतील राष्ट्रपती भवनात जेथे पद्म पुरस्कार देतात तिथे झाली होती.
१९७३ मध्ये प्रसिद्ध लेखक अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येत होता. चटोपाध्याय हे पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जात होते. त्यादरम्यान करीम लाला यांनी त्यांना राष्ट्रपती भवन पाहायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच सोबत येण्याची विनंती केली. नंतर चटोपाध्याय यांनी त्यांना बरोबर नेले. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही तेथे उपस्थित होत्या.
पुरस्कार वितरणानंतर जेव्हा लोकं एकमेकांना भेटत होते, तेव्हाच करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट झाली आणि त्यांच्या त्या भेटीचे छयाचित्र टिपले गेले. दिल्लीतील इंदिरा गांधीं आणि करीम लाला यांच्या या भेटीशिवाय इतर कोणत्याही भेटीची नोंद मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात केली गेलेली नाही, अशी माहिती मिळत आहे. तसेच हा फोटो जवळजवळ ४७ वर्षांनी समोर आला आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा