पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात एका नर्सला मारहाण केल्याप्रकरणी 8 बाऊन्सर यांना अखेर निलंबित केले आहे. आज दुपारी साधारण 4 च्या सुमारास पुण्यात रुग्णालयात गेटवर नर्सला काही जणांकडून मारहाण केल्याचे वृत्त उघडकीस आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयामध्ये पगार घेण्यासाठी आलेल्या नर्सेस आणि ब्रदर्स यांना येथील बाऊन्सरकडून मारहाण झाली. यामुळे एकच गोंधळ झाला होता. मेट ब्रो या खासगी एजन्सीकडे जम्बो कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली आहे. कंत्राटी बाऊन्सरच्या गुंडगिरीमुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा बदनाम झालंय. नर्सेस आणि बाऊन्सरच्या वादात जम्बो कोविड रुग्णालयाच्या गेटवर मारहाण सुरू झाली होती. अखेर व्यवस्थापनाने यावर कारवाई करीत त्या 8 ही बाऊन्सर यांना निलंबित केलंय.
पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये शाळा उघडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पुण्यामध्ये काही शाळा सुरूही झाल्या होत्या, पण पुन्हा एकदा पुणे परिसरात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद केल्या. आता येत्या 4 जानेवारीपासून शाळा ठराविक विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधांचं पालन करून उघडणार आहेत. या संदर्भातले सुधारित आदेश महापालिकेने काढलेत.