जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपवून गावी परतणारे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनाला धरणगाव तालुक्यातील पाळधीजवळ अपघात झाला. या अपघात आमदार पाटील बालबाल बचावले. पाटील यांचे वाहन डीपीच्या तारांवर चढल्याने आमदरांनी चार फुटावरून वाहनातून उडी घेत बाहेर पडले.
सतीश पाटील हे मुंबईहून बैठक संपवून आज सकाळी जळगाव येथे आले होते. तेथून ते त्यांच्या वाहनाने पारोळाकडे जात असताना पळधीनजीक एका वळणावर त्यांच्या वहनासमोर एक दुचाकी आली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपीच्या खांबाला ताण दिलेल्या तारांवर धडकली. यामध्ये वाहनाची पुढील दोन वाहने तारेवर चढली.
वाहनात असलेले पाटील यांचे स्वीय सहाय्यक भैय्या माने व रक्षकाने खाली उतरून गाडीचा पुढील दरवाजा उघडला. त्यावेळी पाटील यांनी उडी घेत बाहेर पडले. त्यानंतर दुस-या वाहनाने ते पारोळा येथील घरी पोहचले.