मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले. यानंतर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर टीका होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, त्यांची मस्ती उतरवली जाईल, असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका- रोहीत पवार
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आक्षेपार्ह विधानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या सहन करु असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपला(BJP) हे कसं चालतं?असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही.महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2022
सरकारच्या मंत्र्याचं हेच हिंदुत्व आहे का? – भाई जगताप
स्त्रियांबद्दल अपशब्द वापरणे हेच शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्र्यांचं हिंदुत्व आहे का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध, अंस काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Congress Mumbai President Bhai Jagtap) यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/BhaiJagtap1/status/1589542079382040576?s=20&t=od50rSgX3FSW9z5qye8sTQ
सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करणार
सत्तारांनी सप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरवेल. राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सरड्याची औलाद अब्दुल सत्तार ने आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांच्या बद्दल जे वक्तव्य केले त्याचा तीव्र निषेध. हा अब्दुल सत्तार आहे का सुतार आहे, 10 पक्ष बदलणारी ही सरड्याची औलाद आदरणीय सुप्रिया ताई बद्दल अश्या खालच्या पातळीवर बोलते. अब्दुल सत्तार तुझ्या सत्तेची मस्ती (1/1) pic.twitter.com/JWgZK9dF7T
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) November 7, 2022
Web Title :- Abdul Sattar | abdul sattar controversial statement on supriya sule ncp aggressive in maharashtra marathi news
हे देखील वाचा :
Pune Crime | दिवसाढवळ्या तरूणीचा विनयभंग; देहूरोड परिसरातील घटना
Abdul Sattar | ‘सुप्रिया सुळे इतकी भिकारXX झाली असेल तर…’, अब्दुल सत्तारांची जीभ घसरली (व्हिडिओ)