औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे आणि तोच शब्द वापरणार असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, ज्यांना खोक्याची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लेडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासून. त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना (सुप्रिया सुळे) उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का, असे सत्तार म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
विरोधक आम्हाला खोके म्हणत आहेत. याच कारणामुळे त्यांची डोके तपासावी लागतील. ज्यांना खोक्यांची आठवण येत असेल त्यांच्यासाठी मी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांची डोके तेथे तपासली जातील, हे भिकारचोट लोक आहेत. स्वत: भिकारचोट आहेत, असे सत्तार म्हणाले.
राजकारण हाच भिकारी धंदा आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतांचे भिक मागतात. मग मतांची भिक मागणारे ते भिकारी नाहीत का? त्यांचे (सुप्रिया सुळे) पतीदेव एक उद्योगपती आहेत. मग त्यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का? असे सत्तार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न
विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील
खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार
यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली.
‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
Web Title :- Abdul Sattar | abdul sattar again basude supriya sule said shall i call her industrialist
हे देखील वाचा :
Abdul Sattar | ‘माफी मागा नाहीतर..’ राष्ट्रवादीचा अब्दूल सत्तारांना 24 तासांचा अल्टिमेटम (व्हिडिओ)
Pune Crime | दिवसाढवळ्या तरूणीचा विनयभंग; देहूरोड परिसरातील घटना