नवी दिल्ली : वृत्त संस्था(बहुजननामा ऑनलाइन) – Unique Identification Authority of India | Aadhaar Card भारतीय नागरिकांचे ओळखपत्र आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक नागरिकासाठी अतियश महत्वाचे आहे. सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रात ते आवश्यक कागदपत्र आहे. Unique Identification Authority of India (UIDAI) वेळोवेळी आधारबाबत सर्वप्रकारचे अपडेट्स देत असते.
नुकतेच UIDAI ने आधारशी संबंधीत महत्वाची माहिती सांगितली आहे ज्या अंतर्गत त्यांनी आधारशी संबंधीत दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. होय UIDAI द्वारे जारी करण्यात आलेला हा आदेश देशातील प्रत्येक आधार कार्ड धारकाला प्रभावित करेल. या आदेशांतर्गत आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होणार आहे.
यापूर्वी याआधाराने भाडेकरू किंवा चुकीचा पत्ता नोंदला गेला असेल तर त्यामध्ये सुधारणा करता येत होती. परंतु UIDAI च्या या आदेशानंतर तुम्ही तुमचा पत्ता अनिश्चित काळासाठी बदलू शकणार नाही. या दरम्यान युआयडीएआयने आपल्या वेबसाइटवरील अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरशी संबंधीत पर्याय हटवला आहे.
युआयडीएआयद्वारे आधार कार्ड धारकांसाठी आणखी एक सेवा बंद करण्यात आली आहे.
ती सेवा आहे आधार कार्ड रिप्रिंट करणे. होय, यानिर्णयानंतर आता जुन्या मोठ्या कार्डच्या ठिकाणी युआयडीएआयने प्लास्टिकचे पीव्हीसी कार्ड लाँच केले आहे.
हे कार्ड आकाराने छोटे आहे यासाठी ते सोबत ठेवणे सोपे होईल.
web title: Aadhaar Card |UIDAI closes 2 special Aadhaar Card related services indefinitely; Find out
Diesel Price in Pune Today | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसर्या दिवशी भाववाढ !
Virbhadra Singh | हिमाचाल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन