पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Diesel Price in Pune Today | पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. उलट पूर्वीपेक्षा अधिक वेगाने ही दरवाढ होताना दिसत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या ८ दिवसातच ५ दिवस पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून गेल्या तीन दिवसात सलग भाववाढ झाली आहे.
Diesel Price in Pune Today | Petrol, diesel prices rise for third day in a row
पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पेट्रोलचे पुण्यातील दर १०६.२२ रुपये लिटर झाला आहे. गेल्या ८ दिवसात पेट्रोलमध्ये लिटरमागे तब्बल १.६८ रुपयांची वाढ झाली आहे. मे महिन्यांपासून सुरु झालेली पेट्रोलच्या दरवाढीत आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे.
डिझेलच्या दरात आज लिटरमागे १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता डिझेलचा दर ९५.३४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलही लिटरमागे ३३ पैशांनी महागले आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर १०९.९० रुपये लिटर झाला आहे. ३ मे रोजी पुण्यात पेट्रोलचा प्रति लिटर ९६.४५ रुपये होता. त्यात ४ मे रोजी लिटरमागे १७ पैशांनी वाढ करण्यात आली होती. आता २ महिन्यात पेट्रोलचा दर १०६.२२ रुपये लिटर झाला आहे. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल तब्बल ९.६७ रुपयांनी महागले आहे. डिझेलच्या दरात गेल्या २ महिन्यात ९़२३ रुपयांनी वाढ झाली आहे.
web title: Diesel Price in Pune Today | Petrol, diesel prices rise for third day in a row.
Virbhadra Singh | हिमाचाल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन
Pune Crime News | माहीती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला 9 दिवसांची पोलिस कोठडी