नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर माणसाचा पाय किंवा हात तुटला तर त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो. परंतु, आर्टिफिशियल अवयव लावल्यानंतर तो काही प्रमाणात स्वत:ला ठिक समजू शकतो. मात्र, असेच एखाद्या जनावराच्या बाबती घडले तर त्यासाठी कोणताही पर्याय नाही की, तो आर्टिफिशियल अवयवाच्या आधारे उर्वरित जीवन जगू शकतो. तर हत्तीसारख्या अजस्त्र प्राण्यासाठी तर हे आणखीच आवघड आहे. सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे.
There is light despite all of the darkness surrounding us. pic.twitter.com/ik7d14h0bs
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 14, 2020
या व्हिडिओमध्ये एक अपंग हत्ती दिसत आहे, ज्याचा पाय तुटलेला आहे. परंतु, एक व्यक्ती या हत्तीची मदत करतो आणि तो पुन्हा आपल्या पायावर चालू लागतो. सोशल मीडियामध्ये या व्यक्तीचे जोरदार कौतूक होत आहे. या व्यक्तीने हत्तीला एक आर्टिफिशियल पाय लावला आणि तो पुन्हा चालू लागला. हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे (आयएफएस) अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर हँडल अकाऊंटवरून शेयर केला आहे. कॅपशनमध्ये त्यांनी लिहिले की, आपल्या चारही बाजूला अंधार असूनही प्रकाश आहे.
22 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खुप आवडला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 32 हजार 100 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर 2900 पेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. याशिवाय व्हिडिओ आतापर्यंत 394 वेळा रिट्विट करण्यात आला आहे. असंख्य यूजर्सने या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे आणि हत्तीला मदत करणार्या व्यक्तीचे कौतूक सुद्धा केले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती अपंग हत्तीचे जीवन कशाप्रकारे सुसह्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्यक्ती अपंग हत्तीला आर्टिफिशियल पाय लावतो आणि नंतर हत्ती सहजपणे चालू लागतो. मात्र, अशाच प्रकारचा एक व्हिडिओ अगोदर सुद्धा सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता, ज्यामध्ये कृत्रिम पायाच्या आधारे हत्ती चालताना दिसत होता.