मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे संजय राऊत यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. संजय राऊत म्हणाले होते की, इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटण्यासाठी मुंबईत येत असत, असा दावा त्यांनी केला होता. परंतु आता त्यांनी ते विधान मागे घेतले आहे. संजय राऊत म्हणाले की, माझ्या वक्तव्याने कोणाला वाटत असेल की इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन होत आहे.
कोणाच्या भावनांना ठेच पोहोचत असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो. संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका सुरु झाली होती. पण काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेतले. राऊत यांनी गौप्यस्फोट करत करीम लालाच्या भेटीला इंदिरा जात असत. इतकेच नाही तर त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांना पहिले असून त्याच्याबरोबर बोलले आहे. त्याला दमही दिला आहे, असाही दावा केल्यामुळे सर्व आश्चर्यचकित झाले होते.
तसेच यावर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया देत ते संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबतची नाराजी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली असून संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे. संजय राऊत यांनी केलेलं विधान चुकीचं होत. इथून पुढे असे होणार नाही, याची खात्री त्यांच्याकडून करून घेतली आहे, असेही थोरात म्हणाले.
Visit : bahujannama.com