नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील अरावल्ली येथे राहणाऱ्या निलांशी पटेल हिने १७ व्या वर्षी नवीन विक्रम करत १९० सें.मी. केसांसह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिच्या केसांची लांबी १७०.५ सें.मी. मोजली गेली होती. ती जेव्हा कुठे जाते तेथील लोकांना तिच्यासोबत सेल्फी काढायची इच्छा होते. तसेच लांब केसांमुळे तिला एखाद्या सेलिब्रिटीसारखे वाटते, असे निलांशीचे म्हणणे आहे.
२०१८ च्या सुरुवातीला सर्वात लांब केसांचा विक्रम अर्जेंटिनामधील ऐब्रिल लॉरेनजटी यांनी केला होता, ज्यांचे केस १५२.५ सेमी लांब होते. त्यानंतर हे रेकॉर्ड १७ वर्षाच्या किटो काव्हाराने त्यांचे रेकॉर्ड तोडले होते, ज्यांचे केस १५५.५ से.मी. होते, असे निलांशीने म्हटले आहे. पण अखेर वर्षाच्या शेवटी निलांशीने १५ सें.मी.च्या फरकाने रेकॉर्ड तोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाचा प्रवेश केला आहे.