मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जून महिन्यामध्ये बॉलिवुडमधून बाहेर पडलेली अभिनेत्री ज़ायरा वसीम, पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दंगल गर्ल नवी दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करताना मुंबईतील एका उद्योगपतीने तिचा विनयभंग केला होता, तिनेच ही माहिती सोशल मीडियावरद्वारे प्रसिद्ध केली होती. कोर्टाने या उद्योगपतीला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले असून त्याचे नाव विकास सचदेव आहे. पोलिसांनी जेव्हा याप्रकरणी गुन्हा दाखल केला तेव्हा ज़ायरा 17 वर्षांची होती. पॉस्को कोर्टाने ज़ायरा तेव्हा अल्पवयीन असल्याने सचदेव यास 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या अभिनेत्रीने आरोप केला होता की, विमान प्रवासात जेव्हा ती झोपण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या बाजूला बसलेला व्यक्ती तिच्याशी लगट करत होता. तर दुसरीकडे आपला बचाव करताना सचदेव याने म्हटले होते की, मी झोपणाचा प्रयत्न करत होतो आणि ज़ायरा वसिमने माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला. मीडियातील वृत्तानुसार विकास सचदेवच्या कुटुंबाने त्याच्या निर्दोष असल्याच्या दाव्याचे समर्थन केले होते. त्यांचे म्हणणे आहे की, विमानातील तो प्रकार एक अपघात होता. दंगल या चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री ज़ायरा वसिमने 29 जून रोजी बॉलिवुड सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही घोषणा केली होती.
एका 18 वर्षीय मुलीने धार्मिक कारणासाठी बॉलिवुडमधील करियर सोडण्याचा निर्णय घेतला, असा उल्लेख तिने केला होता. 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या द स्काय पिंक, या चित्रपटात ज़ायराने शेवटचे काम केले होते. या चित्रपटात प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांची प्रमुख भूमिका होती. टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअरच्या आधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या पार्श्वभूमीवर प्रियंकाने समुद्रकिनार्यावरील ज़ायरासह काही कलाकारांचा फोटो ट्विट केला होता. परंतु, सोशल मीडियावरील युजर्सना तो फार रूचला नव्हता. प्रथम धर्माचा हवाला देऊन चित्रपटातून निवृत्तीची घोषणा करणे आणि त्यानंतर एका नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुढे येणे, हा प्रसिद्धीचा स्टंट आहे, असे सोशल मीडियावरील युजर्सने ज़ायराला उद्देशून म्हटले होते.
Visit : bahujannama.com