पुणे : बहुजननामा ऑनलाइन – माझे आजोबा पडले, वडील पडले त्यामुळे माझ्याबाबतीत निवडणुकीत पडणे हे माझ्यासाठी नवीन नाही. माझ्या पराभावासाठी काँग्रेस प्रयत्न करते असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांनी काँग्रेसला लगावला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसने मला पडाण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर येथून निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या उमेदवारामुळे आंबडेकर यांना अनेकदा अकोला मतदारसंघातून पराभाव स्विकारावा लागला. त्यामुळे महाआघाडीबाबत काँग्रेससोबत बोलण्यासाठी चालढकल केली जात आहे का ? या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडक यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली. निवडणुकीत माझे आजोबा, वडील पडले त्यामुळे मी पडलो हे काही नवीन नाही. जर मला निवडणूक हरण्याची भीती असती तर मी भाजपात गेलो असतो असेही ते म्हणाले.
निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी भाजपा-काँग्रेस सारखे आहेत. माझ्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांसमोर झोळी पसरून मला पाडण्यासाठी याचना केली. त्यामुळे माझा पराभव झाला, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे अकोल्यात भाजपा आणि काँग्रेस एकच असल्याची टीका देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केली.