Sukanya Samriddhi Yojana (SSY) | तुमची मुलगी होईल करोडपती, केवळ ‘या’ योजनेत दरवर्षी करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक!

नवी दिल्ली : Sukanya Samriddhi Yojana (SSY) | मुलीचे शिक्षण, विवाह हे सर्व टेन्शन दूर करायचे असेल तर सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरू करा. ही एक अल्पबचत योजना आहे, जी कर वाचवते, तसेच मोठा परतावा सुद्धा देते. या योजनेत दरवर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीला २१ व्या वर्षी मोठा लाभ मिळू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेबाबत जाणून घेऊया…

मिळतेय इतके व्याज

सुकन्या समृद्धी योजनेत जमा रक्कमेवर सरकार सध्या ८.२ टक्के व्याजदर देत आहे. सरकारने या व्याजदरात सध्या कोणताही बदल केलेला नाही. या योजनेत खातेधारकाला वार्षिक आधारावर २५० रुपयांपासून १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

या योजनेत खातेधारकाला जमा रक्कमेवर कंपाऊंडिंग व्याजदराचा लाभ मिळतो. मुलगी १५ वर्षाची होईपर्यंत गुंतवणूक करावी लागते. यानंतर २१ वर्षाच्या वयापर्यंत पैसे लॉकइन राहतात.

प्रत्येक वर्षी १ लाखाच्या गुंतवणुकीवर किती मिळेल रिटर्न

जर एखाद्या व्यक्तीने मुलीच्या जन्मानंतर ताबडतोब सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर १५ वर्षाच्या वयापर्यंत मुलीच्या खात्यात एकुण जमा रक्कम १५ लाख रुपये होईल. एसएसआय कॅलक्युलेटरनुसार, मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर तिले एकुण ४६,१८,३८५ रुपये मिळतील. यामध्ये १५ लाख रुपये गुंतवणूक केलेली रक्कम आणि ३१,१८.३८५ रुपये व्याजाचे मिळतील.

एसएसवाय योजनेची ठळक वैशिष्ट

* इन्कम टॅक्स कलम ८०सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
* मॅच्युरिटीवर खातेधारकाला मिळणारी रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असेल.
* योजनेत जमा रक्कम प्री-मॅच्युअर काढण्याची परवानगी विशेष परिस्थितीत मिळते.
* मुलीच्या वयाच्या १८ वर्षानंतर खात्यातून ५० टक्केपर्यंत रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येऊ शकते.
* खाते सुरू केल्यानंतर इमर्जन्सी स्थितीत खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.