LPG Price Reduced | सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात किती कमी झाला दर

नवी दिल्ली : LPG Price Reduced | एलपीजी सिलेंडरच्या दरात आज बदल झाला आहे आणि तो स्वस्त झाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात ३०-३१ रुपयांची कपात करण्यात आली असून नवीन दर आजपासून लागू सुद्धा झाला आहे. एलपीजी दरातील ही कपात १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरसाठी आहे.

या कपातीचा परिणामाने रेस्टॉरंट मालक, ढाबा चालक यासारख्या कमर्शियल एलपीजी वापरणाऱ्यांना स्वस्त सिलेंडर मिळेल. मात्र, घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या शहरात कमर्शियल एलपीजी सिलेंडर किती झाला स्वस्त
* दिल्लीत ३० रुपयांनी स्वस्त – १६४६ रुपये
* कोलकातामध्ये ३१ रुपयांनी स्वस्त – १७५६ रुपये
* मुंबईत ३१ रुपयांनी स्वस्त – १५९८ रुपये
* चेन्नईत ३० रुपयांनी स्वस्त – १८०९.५०
* बिहारमध्ये – १९१५.५ रुपये
* अहमदाबाद- १६६५ रुपये

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल नाही, सध्याचे दर –
* दिल्लीत ८०३ रुपये
* कोलकाता ८०३ रुपये
* मुंबई – ८०२.५० रुपये
* चेन्नई – ८१८.५० रुपये