बहुजननामा ऑनलाईन टीम – करवीर तालुक्यातील वडणगे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुख्याध्यापकानेच मुलींचा विनयभंग केला. सहावी सातवी वर्गातील शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलींच्या असहायतेचा फायदा घेत मुख्याध्यापकाने मुलींसोबत अश्लील वर्तवणूक केले. याप्रकरणी या नराधमाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या नाराधामाला पाच दिवसाची कोठडी दिली आहे. बाजीराव गणपती पाटील असे या नराधाम मुख्याध्यापकाचे नाव आहे.
मुख्याध्यपकाच्या या कृत्याबद्दल पीडित मुलींनी धाडसाने एकत्रित येऊन आधी आपल्या पालकांकडे याची तक्रार केली त्यानंतर पालकांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याने वडणगेसह पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. करवीर पोलीस ठाण्यात स्वतः करवीर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी नंतर त्वरितच पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी मुख्याध्यपकाला अटक केले. त्यानंतर मुख्याध्यपकाला बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा प्रकार मुलींनी इतर शिक्षकांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करूनही मुख्याध्यापकाचे कारनामे थांबत नव्हते. १७ जून ते २४ जुलै दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी संपूर्ण गावात बातमी पसरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी ग्रामस्थांनी मुख्याध्यपकावर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्याचबरोबर पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.