पुणे बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवा अन्यथा संभाजी ब्रिगेडला परवानगी द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेने पुणे महानगरपालिका आय़ुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. भाजप नेते RSS चा अजेंडा राबवतात म्हणून बहुजन महापुरूषांना डावलतात. यांना बहुजनांचा इतिहास मान्य नाही. तो डावलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहे. मनपाने पुतळा लवकर बसवावा अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे शिवनिती’ने आंदोलन होईल.असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेड व अनेक शिवप्रेमी, विविध संघटना यांनी वारंवार मागणी करून सुद्धा ‘आयुक्त व महापौर’ चालढकल व वेळकाढूपणा बसवण्यासाठी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात शंभूराजेंची नाटकांमधून बदनामी करणारा राम ग. गडकरीचा पुतळा असण्याचा किंवा बसवण्याचा काहीही संबंध नाही. नाट्यकर्मी अथवा कलाकारांना ते आदर्श असतील तर त्यांनी गडकरींचा पुतळा ‘बालगंधर्व अथवा अन्य ठिकाणी’ सन्मानाने बसवावा. मात्र संभाजी उद्यानात नको. फक्त यामुळेच पुतळा बसवला जात नाही.
छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे. उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचे उत्तम व आदर्श स्मारक करावे व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवावा. महापौर जातीयवादीपणा करून राजकारण करत आहेत. मनपा कारभाऱ्यांची पुतळा बसवावा ही इच्छा नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजी उद्यानात तात्काळ बसवावा. जर मनपा’ची इच्छाशक्ती नसेल तर. ‘पुतळा’ बसवण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’ला परवानगी द्या. असे या पत्रकात म्हटले आहे.