मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील डोंगरी भागात कौसर बाग नावाची ४ मजली इमारत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
डोंगरी परिसर दाटीवाटीचा आहे. या परिसरात असलेल्या कौसरबाग या इमारतीमध्ये १० ते १५ कुटुंबं वास्तव्यास होती. आज या इमारतीचा अर्धा भाग कोसळला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. काही दिवसांपुर्वीच ही इमारत महापालिकेने धोकायदायक इमारतींची यादी जाहीर केली होती. या यादीत ही इमारत होती का याची माहिती अद्याप समोर आली नाही.
दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Mumbai: A four-storey building has collapsed in Dongri area, many feared trapped, fire tenders rushed to the site; more details awaited pic.twitter.com/VtD3iXLfVk
— ANI (@ANI) July 16, 2019