प्रयागराज वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील आमदाराच्या मुलीचा दलित मुलाशी लग्न केल्यानंतर व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता भाजप नेत्याच्या नातीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपचे नेते आणि प्रयागराजचे माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल यांची नात दिक्षा हिने आपल्या जीवाला कुटुंबियांकडून धोका असल्याचे व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
दीक्षाने काही दिवसांपुर्वी एका तरुणासोबत प्रेमविवाह केला. याला कुटुंबियांचा विरोध होता. दीक्षाच्या कुटुंबियांनी प्रयागराज पोलीस ठाण्यात तिचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे.
काय म्हणाली दीक्षा ?
माझं नाव दीक्षा राजपूत आहे. मी ऋतुराज सिंह याच्याशी माझ्या मर्जीने ५ जूलै २०१९ रोजी लग्न केले आहे. मी ऋतुराजसोबत खुश आहे. माजी महापौर आजोबा मुरारी लाल अग्रवाल, पवन अग्रवाल आणि इतर नातेवाईकांना माझी विनंती आहे की, मला पोलीस आणि राजकिय ताकद वापरून त्रास देणं थांबवा. मी माझ्या पतीसोबत आनंदात राहू इच्छिते. माझ्यासोबत काही चुकीचं झालं तर त्याला माझे कुटुंबिय जबाबदार असतील.
यापुर्वी उत्तरप्रदेशातील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने अजितेश नावाच्या दलित मुलाशी लग्न केले होते. त्यानंतर तिला वडिलांकडून जीवाला धोका असल्याचे तिने व्हिडीओ शएअर करून सांगितले होते. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.