मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या अकोला येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पांतर्गत मोठी भरती सुरु झाली आहे. सरकारी नोकरीसाठी ही मोठी संधी आहे. एकूण ७३ जागांसाठी ही भरती असून ४६ वर्ष वयापर्यंतचे उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे.
अकाउंटंट, लिपीक, प्रशासन सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन लेखा सहाय्यक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अभियान कक्ष आणि तालुका अभियान कक्ष येथे काम करावे लागेल.
वयाची अट – २६ जूलै २०१९ ते ३८ वर्षांपर्यंत, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सूट
अर्जाची फी – खुला प्रवर्ग ३७४, मागासवर्गीयांसाठी २७४ रुपये
नोकरीचं ठिकाण – अकोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ ऑगस्ट २०१९
अर्ज करण्यासाठी वेबसाईट – http://akolamsrlm.padbharti.com