बहुजननामा ऑनलाइन टीम – लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्याथेऊर परिसरात एका जुगार अड्ड्यावर कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले(6 card players arrested) असून त्याच्याकडून रु.2200 रोख व जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या थेऊर पोलिस मदत केंद्रातील थेऊरगावच्या पूर्वेला एका वस्तीत काही जण तीन पत्ती तिरट जुगार खेळत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलिस नाईक नितीन सुद्रीक, गायकवाड व इनामदार यांना मिळाली.याबद्दल याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना दिली यावर त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धाड टाकली असता एका पात्राच्या शेडमध्ये पिनू मरीबा सोनवणे, किशोर महादेव लोंढे, दत्ता बाळू चव्हाण, शंकर बापू वायकर, दीपक अभिमान गायकवाड, संतोष सपूल चौकमल तीन पत्ते हातात घेऊन जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
यांना ताब्यात घेऊन समोर जमा असलेली रक्कम गोळा करुन पोलिस स्टेशन मधे आणले व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक गणेश कर्चे करीत आहेत.