बहुजननामा ऑनलाइन टीम – विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेना नेत्यावर निशाणा साधला आहे. अमृता यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन सर्वांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त ट्विट केले आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस (amrita-fadnaviss-sanjay-raut-
आपल्या ट्विटमध्ये अमृता यांनी (Amrita Fadnavis)Naughty हा शब्द वापरला असून त्यावर जाणीवपूर्वक फोकस केला आहे. खा. राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौतबद्दलच्या वादावर बोलताना कंगनाला Naughty गर्ल म्हटले होते. त्यावरुन, चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. आता, अमृता फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त खोचक टोला लगावला आहे. सर्वच देशभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य महिला म्हणून विनंती करते की, आपण सर्वांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही नॉटी पुरुषांच्या आचार-विचारांची घाण फ्लश करुन महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यात मदत करावी, असे ट्विट अमृता यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये कुणाचाही नामोल्लेख केला नाही, पण त्यांच्या बोलण्याच्या रोख खा. राऊत यांच्या दिशेने असल्याची दिसून येते. दरम्यान, यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका केली होती. त्यानंतर, शिवसेनेच्या महिला नेत्यांनी अमृता यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल होते.
गाण्याचे कौतुक करणा-यांचे आभार
अमृता फडणवीस यांनी भाऊबीज दिवशी त्यांच्या मधूर आवाजातील ”तिला जगू द्या… हे गाणं इंटरनेटवरुन रिलीज केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणे त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहे. नारीशक्तीच्या सन्मानार्थ या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे, इंटरनेटवर हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. तर, काहींनी टीकाही केली, त्याबद्दल अमृता यांनी यांनी सर्वांचे आभार मानले. गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज, मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल, असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.