बहुजनामा ऑनलाइन – राईट टू लव्ह ही चळवळ ४थ्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर, पुणे येथे विविध सांस्कृतिक कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेम या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी ही चळवळ उभी केली आहे तसेच एका रॅलीपासून सुरु झालेला प्रवास एका मोठ्या टप्यापर्यंत पोहचला आहे. ४थ्या वर्षात पदार्पणापर्यंत आम्ही अनेक प्रेमविवाह यशस्वीरीत्या लावून दिले आहेत.असे राईट टू लव्ह चळवळीच्या कारकर्त्यानी सांगितले.
या वेळी प्रेम आणि जात वास्तव या विषयावर विशेष परिसंवाद होणार आहे ,तसेच सामाजिक बंधने झुगारून आंतरजातीय व आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांचा सन्मान तसेच मनोगत आयोजित केले आहे.
कार्यक्रमांवेळी सन्माननिय वक्ते म्हणून रवींद्र आंबेकर (वरिष्ठ पत्रकार ) माधुरी जय सरोदे शर्मा (सामाजिक कार्यकर्ते ) जमीर कांबळे (एलजीबीटी कार्यकर्ते )
नारायण पुरी (प्रसिद्ध कवी ) ,के अभिजित , विकास शिंदे ,सुशांत आशा , तसेच इतर विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत