गडचिरोली बहुजननामा ऑनलाईन – गडचिरोलीत जिल्हा परिषदेमध्ये लिपीक असलेल्या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. नदीपात्रात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. प्रेमसंबंधांतून तिचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चंद्रप्रभा अप्पलवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
चंद्रप्रभा या जिल्हा परिषदेत लिपीक म्हणून नोकरी करत होत्या. त्या गडचिरोलीतील कारवाफा गावातील राहणाऱ्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. त्यानंतर पोटेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोर नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. दरम्यान प्रेमसंबंधातून त्यांचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर हत्येमागेचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांनी सुरु केला असून खून करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.