भुवनेश्वर : वृत्तसंस्था- ओडिसाची अनुप्रिया मधुमिता लाकडा देशाची पहिली महिला कमर्शियल पायलट बनली आहे. नक्षलग्रस्त मलकनगिरी जिल्ह्यातील रहिवासी 27 वर्षीय अनुप्रिया इंडिगो एअरलाईंसमध्ये सहपायलट म्हणून लवकरच सेवेत रुजु होणार आहे.
अनुप्रियाचे पिता मॉरिनियास लाकडा ओडिसा पोलिसात कॉन्स्टेबल आहेत. तिची आई जामज यास्मिन लाकडा हाऊस वाईफ आहे. अनुप्रियाचे दहावीपर्यंतचे शिक्षण कॉन्व्हेंटने आणि 12 वीचे शिक्षण सेमेलिदुगाच्या शाळेतून झाले आहे.
अनुप्रियाला लहानपणापासूनच पायलट बनायचे होते. यासाठी तिने आपले इंजिनियरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडले. 2012 मध्ये तिने एव्हिएशन अॅकॅडमी जॉईन केली. 7 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर तिचं पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
अनुप्रिया लाकडाच्या या कामगिरीनंतर कुटुंबाचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीने केवळ कुटुंबाचंच नाव रोशन नाही केलं तर पूर्ण राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अनुप्रिया लाकडाला शुभेच्छा देत म्हटले की, “हे इतरांसाठी एक उदाहरण बनणार आहे.”
अनुप्रियाला नवीन ठिकाणी फिरण्याचाही छंद आहे. तिने आपल्या फेसबुकवरून मित्रांसबोत हँगआऊट करतानाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.