बहुजननामा ऑनलाईन टीम – उत्तरप्रदेशातील कन्नोजमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नोजमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने एका सात महिन्याच्या बाळाला जन्म दिला आहे . बाळाला जन्म दिल्यानंतर मुलीला डॉक्टरांनी त्या बाळाच्या पिताचे नाव विचारले असता, डॉक्टर हैराण परेशान झाले. या अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या बाळाचा पिता दुसरा तिसरा कोणी नसून चक्क तिचा पिता आहे. ही घटना वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे.
हा नराधाम बाप आपल्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीला त्रासदायक अवस्थेत दवाखान्यात सोडून पळून गेला. आता पोलीस या नाराधामाचा शोध घेत आहेत. सातव्या महिन्यातच या मुलीने बाळाला जन्म दिल्याने बाळाची परिस्थिती धोक्यात आहे. आणि या अल्पवयीन मुलीची प्रकृतीही चिंता जनक आहे. या अल्पवयीन मुलीची आणि तिच्या बाळाची सध्या आशा ज्योती केंद्रातील महिला कर्मचारी काळजी घेत आहेत. तसेच केंद्रातील डॉक्टरही या मुलीची स्वतः च्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत.
जर सखा बापच अशी कृती करत असेल तर या अल्पवयीन मुलींनी काय करायचे असा प्रश्न सध्या सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून या फरार नराधम बापाचा शोध घेतला जात आहे.